गोंदिया जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात राबविल्या जाणाऱ्या एच.पी.व्ही. (Human Papilloma Virus) लसीकरण मोहिमेबाबत जनतेला आवाहन केले आहे.
3.3k views | Gondia, Maharashtra | Mar 6, 2026 गर्भाशय मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी लसीकरण गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रामुख्याने एच.पी.व्ही. विषाणूमुळे होतो. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण अत्यंत प्रभावी आहे. जिल्हाधिकारी नायर यांनी स्पष्ट केले की, हे लसीकरण पूर्वी खासगी क्षेत्रापुरते मर्यादित होते, परंतु आता शासकीय यंत्रणेमार्फत ते मोफत उपलब्ध करून दिले जात आहे. जगभरातील सुमारे ५० कोटी महिलांनी ही लस घेतली असून ती पूर्णपणे सुरक्षित आहे.