उरण: आवरे गावातील उपजिल्हा आरोग्य केंद्राला विरोध ?
Uran, Raigad | Mar 28, 2026 उरण येथील आवरे गाव येथे उपजिल्हा आरोग्य केंद्र उभारण्यात येत आहे. यामुळे येथील आवरे, गोवठणे आणि पाले या ग्रुप ग्रामपंचायतीमधील जनतेला याचा खास करून लसीकरणासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग होणार असल्याचे बोलले जात आहे. उरण पूर्व विभागात या पूर्वी जिल्हा परिषदेचे कोप्रोली येथे मुख्य उप ग्रामीण आरोग्य केंद्र उपलब्ध असताना आता आवरे येथे नव्याने होऊ घातलेले उप जिल्हा आरोग्य केंद्र मात्र भलत्याच विषयाने चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र वेळेत पूर्ण होणार की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.