हवेली: एरंडवणा मधील 'अनंत रेस्टॉरंट अँण्ड बार' मध्ये २० हजारांची लूट
Haveli, Pune | Nov 19, 2025 एरंडवणा परिसरात असलेल्या अनंत रेस्टॉरंट अँण्ड बार मध्ये चार चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून गल्ल्यातील २० हजार रुपये चोरून नेले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. अनंत रेस्टॉरंट अॅण्ड बार बंद केल्यानंतर तोंडाला मास्क लावून १० ते १५ मिनिटांनी चौघांनी बारचे शटर वर करून आतमध्ये प्रवेश केला. त्या चौघांनी हातामधील कोयत्याचा धाक दाखवून कर्मचाऱ्यांना दमदाटी केली.