अमरावती: अमरावती विभागात अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी 2,034 कोटीचा मदत निधी मंजूर: विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल
जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यांत अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत म्हणून रब्बी हंगामाकरीता बियाणे व अनुषंगीक बाबींकरीता विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे (3 हेक्टरच्या मर्यादेत) अमरावती विभागाला 2 हजार 34 कोटीचा अतिरिक्त मदत निधी राज्य शासनाने मंजूर केला आहे. यासंदर्भात महसूल व वन विभागाने 4 नोव्हेंबर रोजी शासन निर्णय निर्गमित केला, अशी माहिती विभागीय आयुक्त यांनी दिली.