अंबड: लालवाडी येथे जुन्या वादातून एकास मारहाण प्रकरणी अंबड पोलिसात तक्रार दाखल
Ambad, Jalna | Mar 31, 2026 गावातील जुन्या वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली असून यात एक जण जखमी झाला आहे. ही घटना दि. 25 मार्च 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास मारोती मंदिरासमोर घडली. मिळालेल्या माहितीनुसार, भाऊसाहेब बाबुराव शिंदे (वय 50, रा. लालवाडी) व आरोपी सुनिल विजय जाधव यांच्यामध्ये सुमारे 15 दिवसांपूर्वी किरकोळ भांडण झाले होते. त्याच वादाचा राग मनात धरून आरोपींनी संगनमत करून हल्ला केल्याचे सांगितले जाते. घटनेच्या वेळी सुनिल विजय जाधव, विजय गंगाधर जाधव, संदिप विजय जाधव, महेश आबासाहेब जाधव, ज्