समुद्रपूर: मोहगांवात ज्ञानेश्वर माऊली, तुकारामाचा गजर :नेत्रदीपक दिंडी शोभायात्रेने वेधले सर्वांचे लक्ष
मोहगाव येथे हनुमान देवस्थान कमिटी व गावकऱ्यांच्या वतीने अखंड हरिनाम श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह्याचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताह्याचा समारोप झाला.यावेळी गावातून भव्य दिंडी शोभायात्रा काढण्यात आली.या दिंडी शोभायात्रेचे गावात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.तर दिंडी शोभायात्र सहभागी भक्तांच्या सेवेसाठी ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती.सात दिवस चाललेल्या या अखंड हरिनाम श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सप्ताह्यात ह.भ.प.काटकर महाराज यांनी प्रबोधन केले.