पुणे शहर: पुण्यात चक्क फुटपाथवरून ST बस, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस चालकाचा धोकादायक प्रकार समोर आला आहे. या बस चालकाने चक्क पदपथावरून बस चालवली असून, हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.