पालघर: जिल्ह्यात रेड अलर्ट जारी, अति मुसळधार पावसाची शक्यता
प्रादेशिक हवामान विभागामार्फत वर्तवण्यात आलेल्या हवामान अंदाजानुसार पालघर जिल्ह्यात सात जुलै रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये सतर्कता बाळगावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.