भुसावळ: दिवाळी-छठसाठी मध्य रेल्वेकडून 418 खास गाड्या सुरू, सणातील प्रवाशांसाठी मोठा दिलासा
मध्य रेल्वेने दिवाळी-छठ सणानिमित्त 418 विशेष गाड्या सुरू केल्या आहेत. सीएसटी, पुणे, नागपूर, कोल्हापूर, उत्तर व दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांना सुविधेसाठी या गाड्या 10 ऑक्टोबर ते 18 नोव्हेंबरदरम्यान धावणार आहेत. कोल्हापूर-कलबुर्गी मार्गावरही 64 विशेष फेऱ्या चालवल्या जाणार आहेत.