बसमत: वसमतनगर परीषदेसाठी इतिहासात पहिल्यांदाच नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षीत झाले आहे.
आज दि 6 आक्टोंबर रोजी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वसमतच्या नगर परिषदेचे आरक्षण सोडत जाहीर झाले वसमत नगर परिषद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आली आहे.परिणामी नगर परीषदेच्या सत्ताकेंद्रात महिलांच नेतृत्व मिळणार आहे. तसेच स्थानिक राजकारणात महिलांचा सहभाग वाढून सत्तास्थानी येण्याची संधी निर्माण झाली आहे.प्रत्यक्षात वसमत नगर परिषदेवर आरक्षण महिलांना सुटल्याने त्यांचा चांगलाच हिरमोड झाला. आपण घेतलेला निर्णय चुकीचा ठरतो की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.