परतूर: जालना नांदेड समृद्धी महामार्ग कंपनीवर व ठेकेदारावर गुन्हा दाखल-पो.निरीक्षक सुदाम भागवतनी पोलीस ठाणे येथे दिली माहिती
Partur, Jalna | Jul 4, 2026 आज दि.4 जुलै 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार मर्यादेपेक्षा जास्त मुरम उत्खनन केल्याप्रकरणी जालना नांदेड समृद्धी महामार्ग कंत्राटदार व इन्फोस्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर पाटबंधारे विभागाचे स्थापत्य अभियांत्रिकी योगेश वैद्य यांच्या फिर्यादीवरून विविध कलमांतर्गत 3 जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे,तालुक्यातील दहिफळ भोगाणे या शिवारात या कंपनीने मर्यादेपेक्षा मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी हि तक्रार देण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.