नागपूर शहर: पुन्हा उपराजधानी हादरली! नागपुरात मुलीच्या प्रियकराकडून वडिलांची कुऱ्हाडीने हत्या
नागपूरच्या मानकापूर परिसरात शनिवारी पहाटे एका ४३ वर्षीय व्यक्तीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. घराबाहेर शेडखाली झोपलेल्या मेताबसिंह चौधरी वय ४३ वर्ष यांच्या डोक्यावर अज्ञात हल्लेखोराने कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. मृतक मेताबसिंह यांची मुलगी आपल्या पतीपासून विभक्त होऊन नागपुरात राहत होती आणि रोहित गौतम (वय २५) नावाच्या तरुणाच्या प्रेमात होती.