रावणवाडी येथे ग्रे रंगाच्या बुलेटची चिमुकलीला धडक , रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल
रावणवाडी येथे दिनांक ५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास महिला फिर्यादी यांची ५ वर्षीय चिमुकली ही रस्त्याच्या कडेला जात असताना गोंदिया ते बालाघाट कडे जाणाऱ्या ग्रे रंगाची बुलेट चालकाने आपल्या ताब्यातील वाहन भरधाव वेगाने निष्काळजीपणे चालवून चिमुकल्या मुलीला समोरून धडक दिली. महिला फिर्यादी यांच्या तक्रारीवरून रावणवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.