अलिबाग: अलीबागमध्ये 12 फूट लांब सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार
Alibag, Raigad | Nov 5, 2026 अलीबागच्या चेंढरेमधील मुलांनी 12 फूट लांब सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे. या किल्ल्याभोवती समुद्र, भगवे झेंडे, मावळे आणि घरे यामुळे खऱ्या किल्ल्यासारखं वातावरण आहे. किल्ल्याजवळ नकाशा व माहिती फलकही लावण्यात आला आहे.