नागपूर शहर: तरूणावर जीवघेणा हल्ला; आरोपी आणि दोन अल्पवयीन साथीदार ताब्यात: संजय मेंढे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
तहसील पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी 4 जून ला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार तहसील पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या मोमिनपुरा मुख्य मार्गावर एका युवकावर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या दोन तासांत मुख्य आरोपी अब्दुल तौसीफसह त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे. बद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मेंढे यांनी दिली आहे.