भडगाव: कोठलीत महिलांनी वाळू वाहतुक करणारे डंपर अडविले, महसूल विभागाने डंपर केले जमा,
भडगाव तालुक्यातील मौजे कोठली येथे एक अवैध वाळू वाहतूक करणारे ढम्पर दिनांक 8 जानेवारी 2026 रोजी रात्री 10:00 वाजेच्या सुमारास पकडण्यात आला असल्याची माहिती महसूल विभागाकडून दिनांक 9 जानेवारी रोजी सकाळी 8:00 वाजता प्राप्त झाली आहे. भडगाव तालुक्यातील परिसरातून अवैध वाळू वाहतूक करणारे ढम्पर कोठली सरपंच उज्ज्वला गोकुळ पाटील यांनी महिलांना सोबत घेऊन थांबवत भडगाव तहसीलदार शितल सोलट यांना सुपूर्त करत पुढील कार्यवाहीसाठी महसूल विभागाकडे जमा करण्यात आले आहे.