कवठे महांकाळ: जाखापुर येथील शेतात पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या वादातून एका वयोवृद्ध शेतकऱ्याला धमकी
जाखापुर येथील शेतात पाण्याच्या टाकीच्या बांधकामाच्या वादातून एका वयोवृद्ध शेतकऱ्याला धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भिमराव ज्ञानु साठे (वय ७८, रा. जाखापुर) यांनी संजय ऊर्फ मारुती महादेव पाटील (रा. जाखापुर) याच्याविरोधात कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी साठे यांच्या गट नं. ६३७ मधील शेतात गेल्या आठ महिन्यांपासून आरोपीने सरकारी पाण्याच्या टाकीचे बेकायदेशीर बांधकाम करण्याचा प्रयत्न चालवला होता. यास फिर्यादी यांनी वेळोवेळी विरोध केला.