नागपूर शहर: नागपुरात गोवंशीय जनावरांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
12 जुलैला दुपारी 3:30 वाजता च्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार नागपूरच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, गोवंशीय जनावरांची निर्दयीपणे वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.परठा चौक परिसरात टाटा सुपर ॲक्स वाहनातून ७ जिवंत जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती.मोहम्मद फैजान कुरेशी आणि मुश्ताक खान बकर खान या दोघांना अटक करण्यात आली आहे. जनावरे आणि वाहन मिळून एकूण ३,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जनावरांना गोशाळेत हलवण्यात आले आहे.