यवतमाळ: रामपूर रुंझा टाकळी किनी येथील शेतकऱ्यांची जिल्हा कचेरीवर धडक 15 ते 20 वर्षापासून शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित
फार्मर आयडी नसल्याने शेतकऱ्यांना विविध अडचणीचा सामना करावा लागत आहे वनपट्टी मिळून 15 ते 20 वर्षे झाली परंतु अद्यापही कोणत्याही सरकारच्या योजनेचा लाभ मिळत नसल्याने रामपूर रुंजा टाकळी किनी येथील शेतकऱ्यांनी आज दिनांक 24 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली व आपल्या मागणीचे निवेदन दिले.