कल्याण: वृद्ध महिलेच्या गळ्यातील चैन वर चोरट्यांची नजर पडली, मग चार चाकीतून पाठलाग करत आले अन... थरारक सीसीटीव्ही आला समोर
Kalyan, Thane | Nov 2, 2025 कल्याण पूर्व परिसरामध्ये चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. अशीच घटना कल्याणच्या खडगोलवली घडली आहे. एक वृद्ध महिला रस्त्याने जात होती. यावेळी तिच्या गळ्यातील चैन वर चोरट्यांची नजर पडली. पाठलाग करतच चार चाकीतून आले आणि महिलेच्या गळ्यातील चैन खेचत असताना महिलेने विरोध केला असता तिला खाली पाडून चैन खेचून पसार झाले. यामध्ये वृद्ध महिला जखमी झाली. घडलेला सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे.