पनवेल: एपीएमसीत कार्यालय थाटून इराणमधील व्यापाऱ्याची केली ४ कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक, एपीएमसी पोलिसांत गुन्हा दाखल
Panvel, Raigad | Apr 6, 2024 एपीएमसी तेलीट्रेडर्स नावाने कार्यालय थाटून फरीद तेली व त्याच्या सहकाऱ्यांनी इराणमधील व्यापारी नवाब अमिरजादे यांच्याकडून २३ कंटेनर खजूर मागवला होता. आरोपींनी जेएनपिटीमधून खोट्या पावत्या दाखवून खजूर मिळवला. मात्र ४ कोटी ३६ लाख रुपये व्यवहाराचे पैसे देण्यास या चौघांकडून टाळाटाळ करण्यात येत होती. व्यापाऱ्याने भारतात येऊन एपीएमसीत कार्यालय गाठले मात्र ते बंद होते. या चौघांविरोधात एपीएमसी पोलिसांत व्यापाऱ्याने गुन्हा दाखल केला.