मोर्शी ते तिवसा बस मध्ये चढत असताना तिवसा बस स्थानकातून मोर्शी येथील प्रवासी महिलेचे दागिने लंपास केल्याची घटना, दिनांक 4 जानेवारीला दोन वाजून 45 मिनिटांनी उघडकीस आली आहे. याबाबतीत मोर्शी येथील रामजी बाबा नगरात रहिवासी असलेल्या चित्रा दीपक नेवारे या महिलेने दिनांक 4 जानेवारीला चार वाजून 41 मिनिटांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध दिवसा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपासात घेतला आहे