परभणी: धनगर समाज एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी सवाली विश्रामगृह येथे बैठक
धनगर समाज एस.टी. आरक्षण अंमलबजावणीसाठी पुढील दिशा ठरविण्यासाठी दिपक भाऊ बोऱ्हाडे यांच्या मराठवाडा दौऱ्यानिमित्त परभणी जिल्हा धनगर समाज बांधवांची नियोजन बैठक आज बुधवार 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता परभणी शहरातील सवाली विश्रामगृह येथे पारपडली. याबैठकीस परभणी जिल्हातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.