नागपूर ग्रामीण: गोधणी रेल्वे परिसरात भीषण अपघात; चक्कीखापा टी-पॉइंटजवळ स्प्लेंडर आणि ॲक्टिव्हाची जोरदार धडक, चालक गंभीर जखमी
चक्कीखापा-गोधणी टी-पॉइंटच्या दरम्यान एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. येथे एका स्प्लेंडर आणि ॲक्टिव्हाची समोरासमोर जोरदार धडक झाली असून, या अपघातात वाहनचालक गंभीर जखमी झाला आहे. सध्या या परिसरात सुरू असलेल्या केबलच्या खोदकामामुळे रस्ता अत्यंत संकुचित झाला आहे. परिणामी, येथे वाहनांच्या वर्दळीत अडथळा निर्माण होत असून वारंवार अपघात होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.