मा. पोलीस महासंचालक श्री. सदानंद दाते तसेच मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. चंद्रकिशोर मीना यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे (भा.पो.से.) व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी येथील विश्वेश्वरय्या हॉल येथे कोकण परिक्षेत्रातील रत्नागिरी, रायगड व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले दोन दिवसीय "Capacity Building and Behavioral Leadership Initiative Training" यशस्वीरित्या संपन्न झाले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणामध्ये पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना नेतृत्व कौशल्य, प्रशासकीय क्षमता, प्रभावी संवाद, नागरिकाभिमुख पोलीसिंग, वर्तन कौशल्य तसेच आधुनिक पोलीस व्यवस्थापन या विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी मान्यवर पोलीस उपअधीक्षक श्री. भानुदास खटावकर, श्रीमती मौसमी निलाखे तसेच श्रीमती ईशानी कांचन यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन करत प्रभावी नेतृत्व, निर्णयक्षमता, संघ व्यवस्थापन आणि नागरिकांशी संवेदनशील संवाद याविषयी अधिकारी वर्गाशी संवाद साधला.
CMOMaharashtra Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Uday Ravindra Samant Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Maharashtra Police Headquarter IGP Konkan Range #trainingday
25 views | Ratnagiri, Maharashtra | Jul 23, 2026