ब्रेकिंग : भरदिवसा धारदार शस्त्राने हल्ला, आरोपीचा शोध सुरू
पालघर शहरात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गोल्ड सिनेमा परिसरात एका तरुणीवर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.
या हल्ल्यात तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच पोलिस आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रेमप्रकरण, वैयक्तिक वाद किंवा इतर कोणता मुद्दा आहे का, याचा तपास सुरू आहे.
गर्दीच्या ठिकाणी भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणातील प�
Pune City, Pune | Jun 14, 2026