Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

सोलापुरात घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद; शहर गुन्हे शाखेची दमदार कारवाई, 1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त...

Solapur South, Solapur | Jun 12, 2026
सोलापूर | हॅलो रिपोर्टर न्यूज | मुख्य संपादक डॉ. राजदत्त रासोलगीकर | दिवसा व रात्री घरफोडी करून दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारास सोलापूर शहर गुन्हे शाखेने अटक करून दोन गुन्हे उघडकीस आणत 1 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. एम.आय.डी.सी. पोलीस ठाणे हद्दीत भारतनगर, जुना विडी घरकुल परिसरात 22 मार्च 2026 रोजी दुपारच्या सुमारास बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करण्यात आली होती. याबाबत अंबादास मधुकर पल्ली यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 333/2026 दाखल करण्यात आला होता. तसेच 13 ते 14 मार्च दरम्यान याच परिसरात दुसऱ्या घटनेत घरफोडी करून लॅपटॉप चोरी झाल्याची नोंद गुन्हा क्रमांक 569/2026 म्हणून झाली होती.