हिंगणघाट: येणोरा रोडवर अवैध दारू वाहतूकी विरोधात पोलिसांची कारवाई; ९६ हजार ६५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त
हिंगणघाट पोलिसांनी येणोरा रोडवर अवैध दारू वाहतूकी विरोधात कारवाई करीत दुचाकीसह ९६ हजार ६५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांकडून प्राप्त झाली आहे.प्राप्त माहितीनुसार पोलिसांना येणोरा रोडने अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी याठिकाणी सापडा रचून दुचाकी क्रमांक एच.एच.३२ ए.डब्ल्यू ३६८० ची पाहणी केली असता विदेशी दारुसह ९६ हजार ६५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.