उल्हासनगर: आमदार गणपत गायकवाड यांची तळोजा कारागृहात रवानगी
गोळीबार प्रकरणात भाजप आमदार गणपत गायकवाड यांची बुधवारी उल्हासनगर न्यायालयाने तळोजा कारागृहामध्ये रवानगी केली आहे. २ फेब्रुवारीला हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कॅबिनमध्ये आमदार गणपत गायकवाड यांनी रिव्हॉल्व्हरमधून महेश गायकवाड यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या.