धुळे: नवे कोठारीत महिलेसह पुतण्याला बेदम मारहाण; जुन्या भांडणाची कुरापत काढून हल्ला, सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Dhule, Dhule | Dec 3, 2025 धुळे तालुक्यातील नवे कोठारी येथे पूर्वीच्या भांडणाच्या कुरापतीतून एका महिलेसह तिच्या पुतण्याला मारहाण करण्यात आली. २ डिसेंबर रोजी संध्याकाळी संशयिताने शोभाबाई ठेलारी यांना शिवीगाळ करून हाताबुक्याने तसेच काठीने डोक्यावर प्रहार केला. त्यांच्या पुतण्यावरही काठीने मारहाण झाली. जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. तक्रारीवरून सोनगीर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास हवालदार गीरासे सपोनी टी. एम. देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.