जळगाव लाईव्ह न्यूज । भडगावात खाजगी फायनान्स कंपनीच्या प्रतिनिधीला अडवून मारहाण करत पैशांची बॅग जबरीने लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पाच सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल आणि ५ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive