कन्नड घाटात ST बसचा भीषण अपघात! स्टिअरिंग रॉड तुटल्याने बस बॅरियरवर आदळली
छत्रपती संभाजीनगरहून सुरतला जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) बसचा जळगाव जिल्ह्यातील कन्नड घाटात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. 🚨
रविवारी (२३ ऑगस्ट) दुपारी बसचा स्टिअरिंग रॉड तुटल्याने चालकाचे अचानक नियंत्रण सुटले. काही क्षणांतच बस घाट रस्त्यावरील सुरक्षा बॅरियरला धडकली.
अचानक झालेल्या धडकेमुळे बसमधील प्रवाशांमध्ये एकच घबराट उडाली. मात्र, अनेक प्रवाशांनी प्रसंगावधान राखत बसच्या खिडक्यांमधून बाहेर पडून आपला जीव वाचवला. 🙏
अपघातानंतर प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, जखमींची संख्या आणि स्टिअरिंग रॉड निकामी होण्याचे नेमके कारण याबाबत अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
कन्नड घाटात ST बसचा भीषण अपघात!
स्टिअरिंग रॉड तुटला, बस बॅरियरवर आदळली!
प्रवाशांनी खिडक्यांमधून बाहेर पडून वाचवला जीव!
घाटात ST बसचा थरारक अपघात!
#STBus #MSRTC #KannadGhat #Jalgaon #ChhatrapatiSambhajinagar #Surat #BusAccident #MaharashtraNews #RoadAccident #BreakingNews #LatestNews #ViralNews #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 24, 2026