पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर ‘दादा-भाऊ’चा तोरा बंद! ५६९ मॉडिफाइड सायलेन्सर अन् २,५६६ फॅन्सी नंबर प्लेट्स नष्ट
पिंपरी-चिंचवडच्या रस्त्यांवर मॉडिफाइड सायलेन्सर आणि फॅन्सी नंबर प्लेट्सविरोधात वाहतूक पोलिसांची धडक कारवाई सुरू आहे. 🚨
गेल्या ५-६ महिन्यांपासून सुरू असलेल्या कारवाईत ५६९ बदल केलेले सायलेन्सर जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत. या सायलेन्सरमुळे वाहनांमधून मोठा आवाज आणि फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
यासोबतच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २,५६६ बेकायदेशीर आणि फॅन्सी नंबर प्लेट्स हटवून नष्ट करण्यात आल्या. यामध्ये नोंदणी क्रमांकाऐवजी ‘दादा-भाऊ’सारखी नावे लिहिलेल्या नंबर प्लेट्सचाही समावेश आहे. 🏍️
सार्वजनिक शांतता आणि वाहतूक शिस्तीला बाधा आणणाऱ्या अशा प्रकारांवर कारवाई सुरूच राहणार, असा इशारा पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
‘दादा-भाऊ’चा तोरा बंद! पोलिसांची मोठी कारवा�
Pune City, Pune | Aug 29, 2026