कोल्हावाडी शिवारात बिबट्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वन विभागाने परिसरात पथक तैनात करावे, बिबट्याच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी ट्रॅप कॅमेरे बसवावेत, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्री गस्त वाढवावी, गावालगतच्या शिवारात सर्च ऑपरेशन राबवावे, ग्रामस्थांना सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन व सूचना द्याव्यात, तात्काळ बिबट्याला जेरबंद करून सुरक्षित ठिकाणी हलवावे अशी मागणी परिसरातील नागरीकांच्या वतीने करण्यात येत आहे.