गुजरातमध्ये पावसाचा कहर! पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली कार, VIDEO व्हायरल
गुजरातच्या इडर भागात मुसळधार पावसामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. देबोल परिसरात डोंगरावरून आलेल्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे नदीसारखी परिस्थिती निर्माण झाली आणि रस्त्याच्या कडेला उभी असलेली कार क्षणात वाहून गेली.
सुदैवाने, घटनेच्या वेळी कारमध्ये कोणीही उपस्थित नव्हते, त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. कार पाण्याच्या वेगात वाहून जात असल्याचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले असून, पाण्याचा जोर असलेल्या ठिकाणी जाणे टाळण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
📲 महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Times OfMaharashtra TV News Follow करा.
👍 Like • 💬 Comment • 📤 Share करायला विसरू नका!
#Gujarat #Idar #HeavyRain #Flood #RainAlert #ViralVideo #BreakingNews #WeatherUpdate #TimesOfMaharashtra