तुळजापूर: "आमच्या घराकडे का पाहतोस?" क्षुल्लक कारणावरून कोयता-काठीने मारहाण; एकाच कुटुंबातील तिघांवर गुन्हा
आमच्या घराकडे तोंड करून का बसला आहेस?" या क्षुल्लक कारणावरून तसेच भावाने प्लॉट घेतल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला कोयता आणि काठीने मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिघांविरुद्ध नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आनंद मुकुंद गायकवाड (वय ४४, रा. किलज) यांनी फिर्याद दिली आहे. अशी माहिती ४ सप्टेंबर रोजी ६ वाजता देण्यात आली.