कुलस्वामिनी कला केंद्रात पुन्हा राडा; तरुणाला मारहाण, हवेत गोळीबार आणि तोडफोड
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Mar 1, 2026
आज दि 1 मार्च सकाळी 9 वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील Paithan तालुक्यातील आडूळ येथील थापटीतांडा परिसरातील कुलस्वामिनी कला केंद्रात काल उशिरा रात्री पुन्हा एकदा गोंधळ उडाला. मद्यधुंद अवस्थेतील काही जणांनी रस्त्याने जाणाऱ्या एका तरुणाला बेदम मारहाण केल्याची माहिती असून, त्यापैकी एकाने बंदूक काढून हवेत गोळीबार केल्याची चर्चा आहे. या घटनेनंतर संतप्त जमावाने कला केंद्रावर दगडफेक करत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांच्या काचा फोडल्या तसेच डीजे बंद पाडत खुर्च्या, टेबल, दरवाजे