*प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे 'गर्भसंस्कार शिबिर' व पुस्तिका उद्घाटन सोहळा संपन्न!*
140 views | Sindhudurg, Maharashtra | Apr 15, 2026 *प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे 'गर्भसंस्कार शिबिर' व पुस्तिका उद्घाटन सोहळा संपन्न!* *मसुरे:* ग्रामीण भागातील माता व बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे *गर्भसंस्कार शिबिराचे* आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गरोदर मातांना सुदृढ बाळासाठी आवश्यक असलेल्या संस्कारांचे महत्त्व पटवून देण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गर्भसंस्कार पुस्तिकेचे उद्घाटन करण्यात आले. ही पुस्तिका मातांसाठी संपूर्ण नऊ महिन्यांच्या प्रवासात मार्गदर्शक ठरणार आहे.