किसान जमीन बचाव संघर्ष समिती च्या आंदोलनाला गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीचा पाठिंबा.........
कटंगी येथे किसान जमीन बचाव संघर्ष समिती द्वारा रास्ता रोको आंदोलन आयोजित करण्यात आले होते. केंद्र शासनाच्या रेल्वेने महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या माध्यमाने जमीन संपादित करण्याचे काम चालू केला आहे. ही जमीन शेतकऱ्यांना विश्वासात न घेता त्यांना बाजार भावाप्रमाणे मोबदला न देता जमीन संपादन करण्याचे काम बळजबरीने करण्यात येत आहे. या कृतीला विरोध म्हणून किसान जमीन बचाव संघर्ष समिती द्वारा दिनांक 07 सप्टेंबर 2026 ला गोंदिया तालुक्यातील गोंदिया बालाघाट रोडवर कटंगी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य तो मोबदला मिळत नाही तोपर्यंत गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा राहील असे लिखित स्वरूपात पत्र गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन समितीला देण्यात आले.