समुद्रपूर: धोंडगाव येथे मारहाणहीत व्यक्तीचा मृत्यू प्रकरणी आरोपीला जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावली जन्मठेपेची शिक्षा
समुद्रपुर तालुक्यातील धोंडगाव येथे ४ जुलै २०१८ रोजी मृतक किशोर धाबर्डे वय वर्षे ४५ वर्ष यास गावातील आरोपी जितेंद्र दडमल याने काठीने मारहाण केली होती यात किशोर धाबर्डे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता यासंबंधी साक्षीपुराव्याच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमुर्ती श्रीमती वर्षा.बि.पारगांवकर यांनी आरोपी जितेंद्र दडमल यास जन्मठेपेच्या शिक्षसह १० हजार रुपये दंड व ६ महिने कठोर कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.