समुद्रपूर: मांडगाव येथिल जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांनी संतांची वेशभूषा धारण करून साजरा केला वारी कार्यक्रम
समुद्रपुर तालुक्यातील मांडगाव येथिल जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना आपल्या थोरासंत महात्म्याच्या बद्दल माहिती व्हावी त्यांच्यात आपुलकी निर्माण व्हावी यासाठी वारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विद्यार्थ्यांनी संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज ,संत नामदेव महाराज,संत मुक्ताबाई , संत चोखामेळा, संत गोरा कुंभार इत्यादी अनेक संताच्या वेशभूषेत येऊन वारीत सहभाग घेतला हि वारी शाळेतून गावातील मुख्य मार्गाने काढण्यात आली यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.