समुद्रपूर: वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू वाहन गेले वाहून, पुरात अडलेल्या तिघांना ठाणेदारांनी रेस्कू करीत सुखरूप काढले बाहेर
समुद्रपुर नजिकच्या वाघाडी नाल्याच्या पुरात मालवाहू ट्रक क्रमांक MH 40 N 5834 मध्ये तिघे जण लाहोरी वरुन समुद्रपूरकडे जात असतांना वाहन पुराच्या प्रवाहात वाहत गेले.समय सूचकतेने वाहनातील तिघांनी उडी घेत झाडावर चढून आपले प्राण वाचवले. दरम्यान पुरात अडकलेल्या तिघांना समुद्रपूरचे ठाणेदार संतोष शेगावकर यांनी पोलीस कर्मचारी टीमने विलास शहाणे वय 40 वर्ष, रा. जाम, हिरालाल बारेड वय 26 वर्ष रा. राजस्थान, रामकिसन गौतम वय, 45 रा. मध्यप्रदेश रेस्कू करीत सुखरूप बाहेर काढले.