समुद्रपूर: सांवगी (मिर्झापूर) नदिलाच्या पुरामुळे वाहतूक ठप्प:४ गावांचा संपर्क तुटला
समुद्रपुर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सांवगी (मिर्झापूर) नदिला पुर आल्याने रविवारी सकाळी ६ वाजेपासून या मार्गावरील ४ गावंचा तुटला असून जनजीवन विस्कळित झाले आहे.या मार्गावरील नदी पलीकडे सावंगी, सायगव्हाण ,लोखंडी ,पिपंळगाव हे चार गावे आहेत मात्र सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर असल्याने पुलावरून पाणी वाहत असल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे.तर नदी काठावरील शेतातील पिक पाण्याखाली गेले आहे.तरी या पुलाची उंची वाढविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.