समुद्रपूर: गिरड येथील गुरुकुल विद्या निकेतन येथिल विद्यार्थ्याना गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने वृक्षलागवड संबंधी मार्गदर्शन
गिरड येथील गुरुदेव सेवा मंडळ व निर्सग प्रेमींच्या पुढाकाराने गावातील मिशन १० हजार वृक्षलागवड मोहिमे हाती घेतली असून याच अनुषंगाने गुरुकुल विद्या निकेतन शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षलागवड संबंधी मार्गदर्शन करुन घर तिथे फळझाड या दृष्टिकोनातून सीताफळ रामफळ आवळा बेल आंबा या प्रजातींचे वृक्ष घरी लावण्याकरिता देऊन विद्यार्थ्यांकडून या झाडांना जगवणे व त्यांचा संगोपन व संवर्धन करणे या संदर्भात विद्यार्थ्यांकडून संकल्प घेण्यात आला यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष निर्भय पांडे आदी उपस्थित होते.