पालघर: आमदार राजेंद्र गावित व विलास तरे यांच्या उपस्थितीत पालघर तहसील कार्यालय येथे आमदार आपल्या दारी उपक्रम
नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांचे तात्काळ निराकरण करण्याच्या यातून पालघर तहसील कार्यालय येथे आमदार आपल्या दारी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आमदार राजेंद्र गावित,आमदार विलास तरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम राबवण्यात आला. नागरिकांच्या समस्या जाणून घेत समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यात आले व प्रलंबित समस्या लवकरात लवकर मार्गी लावण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. याप्रसंगी पालघर तहसीलदार, अधिकारी, शिवसेना शिंदे जिल्हाप्रमुख परिसरातील नागरिक उपस्थित होते.