यवतमाळ: ढाणकीत पाणी भरताना शॉक लागून महिलेचा मृत्यू; पावसाळ्यात देखील १५ दिवसाआड येथे नळाला पाणी
ढाणकीत २ नोव्हेंबर २०२५ रविवार रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. नळाला पाणी आले पाणी वाया जाऊ नये म्हणून वर्षा अनंता डांगे राहणार ढाणकी ही ५० वर्षीय महिला नळाची विद्युत मोटर लावून पाणी भरत होती पाणी भरत असताना अचानक ओरडण्याचा आवाज आला त्यामुळे आजूबाजूला असणाऱ्या नागरिकांनी धाव घेतली तेव्हा वर्षा डांगे ह्या नळाच्या विद्युत मोटरी जवळ पडलेल्या आढळून आल्या नागरिकांनी विद्युत्य सप्लाय बंद करून लगेच त्यांना रुग्णालयात नेले परंतु त्यांचा मृत्यू झाला.