मच्छीमार संघटना आक्रमक; पारंपरिक जाळे घेऊन विभागीय आयुक्तालयावर धडक
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Feb 23, 2026
आज दि 23 फेब्रुवारी सकाळी 11 वाजता छत्रपती संभाजीनगर येथे मच्छीमार संघटना आक्रमक झाली असून विविध मागण्यांसाठी त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन छेडले. आंदोलक मच्छीमार पारंपरिक मासेमारीची जाळी हातात घेऊन आयुक्तालयावर धडकले आणि जोरदार घोषणाबाजी केली. मच्छीमारांचे म्हणणे आहे की, संस्थेकडे दिलेले तलाव कायमस्वरूपी ठेवावेत, तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी. याशिवाय १ जानेवारी रोजी काढण्यात आलेला शासन निर्णय (जीआर) रद्द करण्याचीही त्यांनी मागणी केली. मागण्य