सिरोंचा नगर पंचायतमध्ये दि ३० जूलै बूधवार रोजी दूपारी ४ वाजता मोठ्या व नाट्यमय राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातील २ नगरसेविकानी निष्टा बदलत थेट राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार गटात प्रवेश केला. यात सपना समय्या तोकला व महेश्वरी संजय पेदापल्ली या दोघींचा समावेश आहे या पक्ष बदलामूळे पक्षांतर्गत समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.व याचा थेट परीणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाचा निवडणूकीत जाणवणार आहे.