खामगाव: अवैधरित्या दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणाच्या पथकाने अंत्रज येथे पकडले
अवैधरित्या दारू विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या एकास स्थानिक गुन्हे शाखा पथक बुलढाणाच्या पथकाने अंत्रज येथे २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेदरम्यान पकडले.पोकॉ. मंगेश सनगाळे, यांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अंत्रज येथे छापा टाकून प्रदिप राजाराम वानखेडे, यथ 41 वर्ष, रा अंत्रज यास पकडले.व त्याच्या ताब्यातून पोलिसांनी देशीव विदेशी दारू च्या २७.नग शिष्या व वायरची थैली असा एकूण २६१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्याच्याविरुद्ध कलम 65 इ मदाका प्रमाणे नुसार गुन्हा दाखल .