नैताळे शहरात कडकडीत बंद; श्री मतोबा महाराज मंदिरातून ३ किलो चांदीच्या मूर्ती लंपास नैताळे/निफाड (प्रतिनिधी): निफाड तालुक्यातील नैताळे येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नैताळेकरांचे आराध्य दैवत असलेल्या श्री मतोबा महाराज देवस्थान मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास मोठी चोरी केली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या गाभाऱ्यातून सुमारे तीन किलो वजनाच्या दोन चांदीच्या मूर्त्या तसेच भक्तांनी अर्पण केलेली दानपेटी चोरून नेली आहे. या गंभीर चोरीच्या घटनेमुळे संपूर्ण नैताळे शहर